करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आमदार नारायण पाटील यांच्या शनिवारी (ता. ३१) तीन सभा होणार आहेत. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांच्या सभा होणार आहेत.
शनिवारी सकाळी ९.३० वाजता चिखलठाण १ येथे पहिली सभा होणार आहे. त्यानंतर दुसरी सभा दुपारी २ वाजता केत्तूर २ येथे होणार आहे. तर तिसरी सभा सायंकाळी ६ वाजता कोर्टी येथे होणार आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोर्टी, केम, वांगी, पांडे, वीट व चिखलठाण या जिल्हा परिषदेच्या गटात उमेदवार आहेत. तर पांडे, रावगाव, कोर्टी, केत्तूर, वीट, हिसरे, चिखलठाण, उमरड, वांगी, जेऊर, केम व साडे या गणात उमेदवार आहेत. आमदार पाटील व मोहिते पाटील या निवडणुकीत स्वतंत्र उतरले आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची देखील पाटील यांच्या पॅनेलला साथ नसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे.
