After Jagtap and Shinde call Sawant withdrawal from the Karmala Bazar CommitteeAfter Jagtap and Shinde call Sawant withdrawal from the Karmala Bazar Committee

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल, पाटील व जगताप गटामध्ये समझोता झाल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक व सावंत गटाचे प्रमुख सुनील सावंत यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ‘माजी आमदार जयवंतराव जगताप आणि आमदार शिंदे यांच्या आदेशाने आपण अर्ज मागे घेतला असल्याचे’ त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

सावंत म्हणाले, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनेही सर्व गटाने समझोता करावा. या निवडणुकीतून मी अर्ज मागे घ्यावा म्हणून माजी आमदार जगताप यांनी स्वतः आमचे बंधू पपू सावंत यांच्याशी संपर्क साधला होता. आमदार शिंदे यांनी थेट माझ्याशी बोलून अर्ज मागे घेण्याबाबत सांगितले होते. वरिष्ठ व प्रमुखांचा मान राखत आपण तालुक्याच्या दृष्टीने निवडणुकीतून अर्ज मागे घेतला आहे, असे ते म्हणाले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *