सोलापूर : सोलापूर शहरामध्ये सुमारे 1200 गणोत्सवाकरीता मंडप व पेंडॉलचे परवाने सोलापूर महापालिका यांचेकडून वितरीत होतात. महापालिका क्षेत्रामध्ये आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉल तपासणी करण्यासाठी एकूण आठ विभाग निहाय मंडप तपासणीकामी पथकाची नियुक्ती करणेत आलेले आहे. पथकाकडून मंडपची तपासणी करण्यात येणार आहे. पथकावर नियंत्रण ठेवणेकामी नियंत्रण पथकाची नियुक्ती करीत असलेबाबत सुचना दिलेले असून सदर नियंत्रण पथकामध्ये महसूल विभागातील तहसिलदार, पोलिस विभागातील पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, सोलापूर महापालिकेतील सहा. आयुक्त, तसेच महावितरणमधील अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. 1 यांनी कळविले आहे.
नियंत्रण पथकाकडुन आगामी गणोत्सवाचे अनुषंगाने मंडप / पेंडॉलचे अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिका हद्दील सर्व गणोत्सव मंडळ / संघटनांना तसेच नागरीकांना सदर मंडप/पेंडॉल तपासणी कामी आलेले पथकास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. 1 यांनी केलेले आहे.