करमाळा (सोलापूर) : नवरात्रोत्सवानिमित्त राजमुद्रा ग्रुपच्या वतीने शनिवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजता गणेशनगरमध्ये ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिलांसाठी खुल्या भव्य स्पर्धा होणार आहेत. यामध्ये प्रत्येक महिलेला आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मायाताई भागवत, सुनीता भोसेकर, ज्योत्सना बनकर, नलिनी जाधव, तनुजा माने व पुष्पा गोसावी या संयोजन करत आहेत.