Attractive Gauri Decoration Competition organized by Kugaon Gram PanchayatAttractive Gauri Decoration Competition organized by Kugaon Gram Panchayat

करमाळा (सोलापूर) : कुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन सरपंच सुवर्णा पोरे यांनी केले आहे. गौराई हा महिलांचा महत्त्वाचा व आवडीचा सण मानला जातो या दिवशी घराघरांमध्ये गौराईंचं मोठ्या धुमधडाक्यात आक्रमण होतं घरातील महिला मंडळी मोठे श्रम घेऊन या गौराईंची सजावट आरास करतात दोन दिवस गावातील महिला आवर्जून एकमेकींच्या गौराई पाहण्यासाठी हळदी कुंकाच्या निमित्ताने भेटत असतात या सणाला आणखी भव्य स्वरूप देण्यासाठी कुगाव येथे प्रथमच ग्रामपंचायतच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकर्षक गौरी सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीसचांदीचा गणपती द्वितीय बक्षीस पैठणी साडी, तृतीय बक्षीस नथ, उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी अगोदर नाव नोंदणी करून घ्यावी. नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायतीकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *