करमाळा (सोलापूर) : श्रावणातील पहिल्या सोमवारी (ता. २८) फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात १०८ कुंडी रूद्रयागचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ समाज सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी ७ वाजता भुपाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून साडेसात वाजता स्वामी महाराजांना षोडशोपचार अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता रुद्र यागाला सुरुवात होणार आहे. रुद्र योगानंतर दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद झाल्यानंतर दुपारी २ वाजता भाविकांसाठी प्रश्नोत्तरे सेवा घेण्यात येणार आहे.
श्री स्वामी समर्थ मंदिर (श्री गुरुपादुका मठ) येथे १०८ जोडप्यांच्या सहभागातून पार पडणाऱ्या या सेवेत सहभागी होण्यासाठी ८८८८१५०९७५ किंवा ९९२२०२२३२६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.