विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी ‘भविष्यावर बोलू काही’

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळ सचिव विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. ६) प्रा. गणेश शिंदे यांचे ‘भविष्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार आहे. याशिवाय महाविद्यालयात विविध कार्यक्रमही होणार आहेत. यशवंत परिवाराच्या वतीने हे कार्यक्रम होणार आहेत.

महाविद्यालयामध्ये यशवंत युवा महोत्सव होणार असून यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. रांगोळी स्पर्धा, मिस मॅच डे यासह शनिवारी (ता. 1) संगीत खुर्ची व लिंबू चमचा होणार आहे. सोमवारी (ता. 3) रॅम्प वॉक, मिस वाय. सी.एम. व शेलापागोट्याच्या कार्यक्रमचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. 4) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. 5) सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. गुरुवारी (ता. 6) सकाळी 10 वाजता यशवंत परिवाराच्या वतीने परिवाराचे आधारस्तंभ विलासराव घुमरे यांचा सन्मान सोहळा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *