करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे (मंगळवारी) ५ तारखेला ३ दुपारी ३ वाजेपर्यंत १५ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारणमध्ये तात्यासाहेब शिंदे व महादेव कामटे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. याच मतदार संघात महिला राखीवमध्ये देवशाला पाटील, भारती भोसले व शैलाबाई लबडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागासवर्गमध्ये शिवानी राखेंडे यांचा अर्ज आला आहे. विमुक्त व भटक्या जमातीमध्ये नागनाथ लकडे यांचा अर्ज आला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात दादासाहेब जाधव, प्रवीण भोसले व गोरख लबडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. एससी मतदारसंघात सारिका चांदणे व सचिन अब्दुले यांचा अर्ज दाखल झाला आहे. आर्थिक दुर्बल मतदारसंघात हनुमंत ढेरे यांचा अर्ज दाखल झाला आहे. याशिवाय व्यापारी मतदारसंघात मनोज पितळे व परेशकुमार दोशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत.
