पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन

सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे आयटीआय उत्तीर्ण 12 वी उत्तीर्ण, डिप्लोमा व पदवीधर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी 19 मे रोजी सकाळी 10 वाजता PM National Apprenticeship Mela (PMNAM) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. आर. भालचिम यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *