करमाळा (सोलापूर) : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा सोमवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे होणार आहे. सोलापूर जिल्हा सेवा समिती अंतर्गत करमाळा तालुका यांच्या वतीने हा सोहळा होणार आहे.
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांच्या पादुकांची सकाळी ९ वाजता शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर पादुकांचे संतपीठावर आगमन होणार आहे. या निमित्ताने निराधार महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहे. गुरुपूजन, आरतीपूजन, प्रवचन, उपासक दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी असे कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्व- स्वरुप संप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गरजू सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे काम केले जात आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने राज्यात सामाजिक काम केले जात आहे. करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव मारुती भोसले, जिल्हा निरीक्षक सचिन काकडे, महिला अध्यक्ष सविता परांडे, जिल्हा युवा अध्यक्ष देविदास ननवरे, जिल्हा कर्नल अशोक केळकर, करमाळा तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले, महिला तालुकाध्यक्ष रोहिणी सरडे, विशेष कार्यवाहक संतोष हंडाळ यांनी केले आहे.