राष्ट्रवादीच्या करमाळा शहराध्यक्षपदी पठाण, कार्याध्यक्षपदी कारंडे

Pathan as Karmala city president of NCP Karande as working president

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी युवकच्या (अजित पवार गट) करमाळा शहर अध्यक्षपदी सोहेल अब्दुलकदार पठाण यांची तर शहर कार्याध्यक्षपदी श्रीराम कारंडे यांची निवड झाली आहे. आज (बुधवारी) राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात राष्ट्रवादी युवकचे काम करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले. या निवडी सोलापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, राजेंद्र हजारे, करमाळा तालुकाध्यक्ष भरत आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, उपाध्यक्ष बापू तांबे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *