Ujani water Shivaji Bandgar met Guardian Minister Chandrakant Patil in Mumbai

करमाळा (सोलापूर) : उजनीच्या पाण्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन धरणग्रस्तांच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवारी) मुंबईत उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर यांना दिले आहे. प्रा. बंडगर यांनी पालकमंत्री पाटील यांची मुंबईत भेट घेऊन उजनीत पुणे जिल्ह्य़ातील 19 धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी केली.

उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून जलाशयाच्या काठावरील शेतकरी भिगवण येथे गुरुवारी (ता. १) सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रा. बंडगर यानी मुंबईत पालकमंत्री यांची भेट घेतली आहे. तेव्हा पाटील यांनी ‘पुढील आठवड्यात या बाबतीत शासकीय अधिकारी व संघर्ष समिती यांची बैठक लावून आढावा घेण्यात येईल व पुढील निर्णय घेण्यात येईल’, असे सांगितले आहे.

प्रा. बंडगर यांनी वरच्या धरणातून पाणी उजनीत सोडण्याच्या मागणी बरोबरच असून चालू असलेले अनाठायी आवर्तन बंद करावे, समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे, कालवा सल्लागार समितीत तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांचे प्रतिनिधी घ्यावेत याही मागण्या केल्या आहेत. त्याच निमित्ताने भिगवण येथे होणाऱ्या रास्ता रोकोला शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *