करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे कुलदैवत श्री कमलाभवानी मातेची महिमा सांगणारे गीत तयार केल्याबद्दल पार्श्वगायक संदिप पाटील व पार्श्वगायक प्रवीण अवचर यांचा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कमलाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री देवीचामाळ येथे नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. येथे विविध ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी येतात. या देवीचा महिमा सांगणारे गीत संदीप पाटील व प्रवीण अवचर यांनी तयार केले आहे. पाटील व अवचर यांना गायन काम करत असताना राज्यस्तरीय अनेक पुरस्कार भेटले आहेत. मात्र पण आपल्या गावात सन्मान व कौतुकाची थाप नक्कीच पुढील कामास प्रेरणा देईल, असे पाटील यांनी सांगितले आहे. पाटील हे पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्षही आहेत. ते काम पहात छंदही जोपासत आहेत.
श्री कमलाभवानी मातेची महिमा सांगणारे गीत तयार केल्याबद्दल पाटील व अवचर यांचा सन्मान
