करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात असलेल्या आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा सोमवारी (ता. ७) संगोबा येथे प्रचाराचा नारळ फुटणार आहे. यावेळी गटातील पदाधिकारी व नेत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे व आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये प्रमुख लढत असल्याचे दिसत आहे. प्रा. रामदास झोळ यांचा पॅनल या निवडणुकीत किती मते घेणार हे पहावे लागणार आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यात पाटील व शिंदे यांच्या प्रतिष्टेची ही निवडणूक होऊ लागली आहे. पाटील यांना मोहिते पाटील यांचा पाठींबा आहे.