अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीही आता आक्रमक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराडमध्ये आलेले असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर शपथ घेतलेल्या नऊजणांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखले केली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केल्यानंतर संख्याबळ पाहून निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
