कराड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (सोमवारी) कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले आहेत. अजित पवार हे भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते कराडमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी सरकारवर टीकास्र सोडले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला आपल्यातील काही लोक बळी पडले, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. पवार म्हणाले, राष्ट्रवादी फोडणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवेल. समाजात भीती निर्माण करण्याचा सध्या प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.
