Madha Loksabha निंबाळकरांसाठी करमाळ्यात राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन

Planning of Raj Thackeray's meeting in Karmala for MP Ranjitsinh Naik Nimbalkars

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन सुरु आहे. निंबाळकर यांना करमाळ्यातून मताधिक्य देण्यासाठी मनसे देखील आता मैदानात उतरली असल्याचे यावरून दिसत आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे म्हणाले, महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांना विजयी करत मताधिक्य देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी करमाळ्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा घेण्याचे आम्ही नियोजन करत आहोत. मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, करमाळा तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्यासह आम्ही ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला जाऊन तारीख घेणार आहोत. लवकरात लवकर करमाळा शहरांमध्ये राज ठाकरे यांची सभा होईल, असे नियोजन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *