करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुलांची शाळा नंबर १ येथे शिक्षण सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम होत आहेत. शिक्षण सप्ताहच्या सहाव्या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. कौशल्य शीर्षकांतर्गत पहिलीतील विद्यार्थी शिवराज बोकन याने वेगवेगळ्या प्रकारात हलगी वाजवली.
शिक्षण सप्ताहमध्ये वृक्षारोपणावेळी ३० झाडे लावण्यात आली. पत्रकार तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विशाल घोलप, सदस्य सागर वनारसे, पत्रकार अशोक मुरूमकर, मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यावेळी उपस्थित होते.
शाळेचा माजी विद्यार्थी ऋषीकेश कदम याची कृषी सहायकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ऋषीकेशने आपले विचार व्यक्त करताना शाळेतील मुख्याध्यापक वर्गशिक्षक माझे पालक या सर्वांचाच सिंहाचा वाटा आहे. आई वडील व गुरुजन यांना कधीही विसरू नका तुम्हीही अभ्यास करून खूप मोठे व्हा, अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कौशल्य उपक्रमअंतर्गंत पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मुखवटे तयार केले. शाळेतील विविध उपक्रम व गुणवत्ता नुकतीच झालेली शालेय दिंडी याबद्दल समाधान व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वर्षाताई करंजकर, उपाध्यक्ष आसीफ जमादार यांनी उपक्रमाचे कौतुक केले.