Agitation on Friday if the encroachment on the road in Kumbharwada is not removed

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात कुंभारवाडा येथे खंदका जवळ केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी (ता. २६) करमाळा नगरपालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा येथील विशाल कुंभार यांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी प्रियंका अंबेकर व मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

कुंभार यांनी निवेदनात म्हटले आहे की, कुंभारवाडा जवळील खंदक रोडवर पदाचा गैरवापर करून माजी नगरसेविका सीमा कुंभार व त्यांच्या नातेवाईकांनी झाडे तोडून सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व नगरपालिकेने तात्काळ अतिक्रमण काढावे. यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *