करमाळा (सोलापूर) : पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्यामुळे करमाळा तालुक्यातील एका तरुणाच्या हाताला काम मिळाले आहे. प्रथम फाऊंडेशनची माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुण संबंधित तरुणाने प्रशिक्षण घेतले आणि आता त्याला एका कंपनीत नोकरी मिळणार आहे. किरण झांजुर्णे असे त्या तरुणाचे नाव आहे.
किरण झांजुर्णे म्हणाला, ‘मी करमाळा तालुक्यातून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कामरगाव अहिल्यानगर येथे वेल्डिंग कोर्ससाठी आलो आहे. मला प्रथम एज्युकेशन विषयीची माहिती करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्याकडून मिळाली. प्रथम फाउंडेशन येथे येऊन वेल्डिंग कोर्स घेतला आहे. यामध्ये आतापर्यंत आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, co2 वेडिंग, प्लाजमा कटिंग शिकलो आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर संस्थेकडून चांगल्या कंपनीत नोकरी मिळणार आहे. येथे राहण्याची व जेवणाची मोफत व उत्तम सुविधा आहे.