Maharashtra Student Innovation Challenge District Level Presentation Session

सोलापूर : शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटी, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभाग तसेच उद्यम इनक्यूबेशन केंद्र, पुण्यश्लोक अल्यिादेवी होळकर, विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा सोलापूर विद्यापीठामध्ये झाली. (Maharashtra Student Innovation Challenge District Level Presentation Session)

स्पर्धेचे उदघाटन उपजिल्हाअधिकारी संतोषकुमार देशमुख व विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी नाविन्यपूर्ण उद्योजकतेचे देशातील आणि जगातील महत्व अधोरेखित केले. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतचे स्वप्न साकार करण्यसासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे यासाठी शासनस्तरावर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत असल्याचे सांगीतले. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅजेंज या उपक्रमामध्ये येणाऱ्या काळात अधिकाधिक नवसकंकल्पना घेवुन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग वाढवावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी उपस्थितांना केले. यावेळी डॉ. दामा यांनी विद्यापीठाचे इन्क्युबॅशन केंद्र विविध संकल्पनांना साथ देईल अशी ग्वाही देऊन सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार हणमंत नलावडे आणि उद्योजकता विभाग यांनी प्रस्ताविक केले. त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महारार्ष्ट स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था स्तरावर प्रत्येकी उत्कृष्ट 2 याप्रमाणे एकूण 38 नवसंकल्पनांची निवड झाली असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी 12 नवसंकल्पना सादरीकरण घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत कळविण्यात आले असल्याचे सांगीतले. या सर्व स्पर्धकांचे जिल्हास्तरावर सादरीकरण सत्र बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सोसायटीमार्फत देण्यात आलेल्या तज्ञ परिक्षकामार्फत घेण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामधील नवसंकल्पना मांडणाऱ्या सर्व सहभागी Innovator यांनी उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण करावे. या 12 विद्यार्थ्यांना या वर्षी जिल्हास्तरीय सादरीकरण करण्यासाठी संधी मिळालेली नाही. त्यांनी पुढच्या वर्षी अधिक चांगल्या प्रकारे आपली नवसंकल्पना सादर करावी व भविष्यातही महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित केलेल्या स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज सारख्या योजनांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले.

विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या प्रभारी संचालिका डॉ. अंजना लावंड यांनी विद्यापीठाचे उद्यम इनक्युबेशन केंद्र आणि विद्यापीठ करत असलेला विविध योजनांची थोडक्यात माहिती दिली तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांना विद्यापीठाचे इनक्युबॅशन केंद्र योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देईल यांची ग्वाही दिली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *