करमाळ्यात संगणकावर चालणाऱ्या जुगारावर पोलिसांचा छापा

Police raid on computer based gambling in Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळा एसटी स्टॅन्ड परिसरात एका गळ्यात बेकायदा मटका चालवणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एक संगणक संच व २०० रुपये रोख असा ८ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद दहिहंडे यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे. तर सतीश ज्ञानदेव फंड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

करमाळ्यात एसटी स्टँड परिसरात एका गाळ्यात पैशावर बेकायदा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणी पोलिसानी छापा टाकला. तेव्हा मनोरंजन व्हिडिओ पार्लरमध्ये बेकायदा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथे दोघेजण होते मात्र त्यातील एकजण पळून गेला तर एकाला पोलिसानी पकडले आहे. याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई 19 तारखेला झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *