करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील झरे येथील जाणाऱ्या व वीट, अंजनडोह, हजारवाडी भागातील नागरिकांसाठी महत्वाचा आलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर अनेक रस्त्यावर खडी उघडी पडली असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या भागातील नागरिकांची याच रस्त्यावरून ये- जा असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. हा खराब रस्ता असल्यामुळे बऱ्याच वेळा रस्त्यातच वाहनांचा खोळंबा होत आहे. याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रस्ता दळणवळणाचा मुख्य भाग असून संबंधित विभागाने लक्ष देत रस्ते दुरुस्ती करण्याची गरज आहे, अशी मागणी प्रहारचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी केली आहे.