करमाळा (सोलापूर) : मुलीला सासरी सोडवून लुनावर (मोटारसायकल) घरी येत असताना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरची धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील ससुन येथे उपचार सुरू आहेत. दशरथ वसंत हुलगे (वय 52, रा. पोमलवडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये त्यांची पत्नीने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून रामवाडी येथील करचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रतीक गणपत वारगड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोमलवाडी येथील जखमी हुलगे हे मुलीला सासरी सोडवण्यासाठी दुचकीवर गेले होते. रामवाडी येथे तिला सोडवून ते जितीच्या दिशेने येत असताना दत्ता गायकवाड यांच्या शेताजवळ आले तेव्हा भरधाव वेगात आलेल्या वारगड यांच्या कारने (एम. एच. १५ सी. डी. १४०९) समोरून त्यांना जोरची धडक दिली. रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने धडक दिली. हा अपघात एवढा जोरात होता की कारने त्यांना दुचाकीने फरफडत नेले. त्यात त्यांच्या गुडघ्याला, पायाला व खुब्याला गंभीर मार लागला आहे. त्यांचा मणकाही फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर भिगवण, बारामती येथे खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुण्यात ससूनमध्ये दाखल केले आहे. हा अपघात २१ तारखेला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाला आहे.