Preliminary Round of 62nd Amateur State Drama Competition in Solapur from MondayPreliminary Round of 62nd Amateur State Drama Competition in Solapur from Monday

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने होणाऱ्या 62 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सोमवारपासून (ता. 20) सुरू होणार असल्याची माहिती स्पर्धा समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषन चवरे यांनी सांगितले. या स्पर्धेत १५ संघाचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 20 पासून सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी 7 वाजता सुरू होणार असल्याचेही धाबळे यांनी सांगितले. पहिल्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे जगी धन्य तो लेखक दिग्दर्शक आनंद खरबस
करमाळा तालुक्यात सापडल्या 10893 कुणबी मराठा नोंदी

दि. 21 नोव्हेंबर – अस्तित्व मेकर्स फौडेंशन सोलापूर यांचे मजार लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शक किरण लोंढे
दि.22 नोव्हेंबर – बनशंकरी बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांचे यस इटस माय ऑर्डर लेखक दिग्दर्शक रत्नाकर जाधव
दि.23 नोव्हेंबर भारतीय क्रिडा शिक्षण व नाट्य मंडळ सोलापूर यांचे विठु माझा लेकुवाळा लेखक प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक सुमित फुलमामडी
दि. 24 नोव्हेंबर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान चिखर्डा यांचे एक नार गाव बेजार लेखक ए जी राठोड, दिग्दर्शक देवशाला मस्सेकर
दि. 25 नोव्हेंबर पंचशील सामाजिक मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था लऊळ यांचे गोष्ठ जन्माष्टमीची लेखक वसंत कानेटकर, दिग्दर्शक डॉ दिनेश कदम
दि. 26 नोव्हेंबर स्वप्नील सपना लोकला विकास मंडळ यांचे फरारी लेखकर स्वप्नील वामन बावळे, दिग्दर्शक सपना वामन बावळे
दि. 30 नोव्हेंबर संभव फौडेशन यांचे एनिमल प्लॅनेट लेखक किरण येले, दिग्दर्शक इम्तियाज मालदार
दि. 1 डिसेंबर संकल्प युथ फौडेंशन सोलापूर यांचे चॉंदनी लेखक रोहित पगारे, दिग्दर्शक नितेश फुलारी
दि. 2 डिसेंबर स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्टस अॅन्ड फाईन आर्टस पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांचे खिड्नया लेखक रविशंकर झिंगारे, दिग्दर्शक अमोल देशमुख
दि. 4 डिसेंबर शोध क्रिडा संस्कृती सामाजिक संस्था कुर्डुवाडी यांचे दुसरा अंक लेखक रविशंकर झिंगारे, दिग्दर्शक डॉ.सायली सुर्वे
दि. 5 डिसेंेबर राजश्री विश्वकल्याण मल्टिपर्पज सोसायटी सोलापर यांचे पाय टाकुनी जळात बसला लेखक मुककुंद मधुकर हिंगणे , दिग्दर्शक रणधीर रामदास अभ्यंकर
दि. 8 डिसेंबर विश्वकर्मा फौडेंशन सोलापूर यांचे ज्ञ लेखक रविंशकर झिंगारे, दिग्दर्शक नमिता देशमुख
दि. 10 डिसेंबर झंकार सांस्कृतिक मंच सोलापूर यांचे आला रे राज (राजदंड ) लेखक दिलीप जगताप, दिग्दर्शक प्रथमेश माणेकरी
दि. 11 डिसेंबर झापुर्जा नाट्य मंदिर सोलापूर समांतर लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शक अश्विनी अमिर तळवळकर

असे सर्व नाटक होणार आहेत तरी रसिक श्रोत्यांनी या सर्व नाटकांना उपस्थिती राहून नाटकाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन समन्वयक अमोल धाबळे यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *