Sahitya Ratna Republic Anna Bhau Sathe Development Corporation will meet on WednesdaySahitya Ratna Republic Anna Bhau Sathe Development Corporation will meet on Wednesday

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यासाठी बुधवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. योजनांचा लाभ तळागाळपर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता योजनांचा प्रचार,प्रसार व जास्तीत जास्त लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चव्हाण यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *