करमाळा (अशोक मुरूमकर) : मनोज जरांगे यांची करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे शनिवारी (ता. २३) सायंकाळी ४ वाजता सभा होणार आहे. या सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांची गावकऱ्यांनी व परिसरातील समाजबांधवांनी नियोजन केले आहे. येथे येणाऱ्या समजा बांधवांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. येथे मराठा आरक्षणावर जरांगे काय बोलतील व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा लढा सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांची आहे. यासाठी सगेसोयरेंचा अध्याध्यश लागू करावा, अशी त्यांची मागणी आहे. दिवेगव्हाण येथे होणाऱ्या सभेसाठी करमाळा तालुक्यातील अनेक समाजबांधव जातील हा अंदाज असून त्याची तयारी गावकरांनी केली आहे.

