There is a rush in the tehsil office to collect the documents required to get the Kunbi certificates

कर्तृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नसतं ते स्वकर्तुत्वाने कमवावं लागत! मुळातच कर्तुत्ववान म्हणजे काय जी कोणी स्त्री आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर स्वबळावर कोणत्याही स्पर्धेत जिवनाच्या कुठल्याही टप्यावर आपल्या हुशारीने कोणत्याही एका क्षेत्रात सगळ्यात मोठे यशाचे शिखर गाठते व त्या यशाने आई वडीलांचे समाजात नाव उज्वल होते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाने समाजिक दृष्ट्या नागरिकांचा प्रंचड लाभ होतो आणि समाज त्यांच्याकडे आदराने आणि विनम्रतेने पाहतो.

माझ्या दृष्टीने कर्तुत्व म्हणतात बहुतेक कर्तृत्व यापेक्षा काही वेगळे नसावे आणि अशाच व्यक्तिमत्त्वांना कर्तुत्ववान म्हणावे. शिल्पा ठोकडे या करमाळा तालुक्यात तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून त्यांचे काम पाहत आहे अतिशय कठोर शिस्तीच्या पण मनात स्वच्छ भावना असलेल्या तहसीलदार आहेत. तक्रार घेऊन आलेल्याचे स्पष्टपणे ऐकून घेऊन त्यातील सत्यता तपासून योग्य तो न्याय देणाऱ्या कर्तृत्ववान तहसीलदार म्हणून त्यांची ओळख आहे. तहसील आवारात न्यायाच्या अपेक्षेने आलेला माणूस खाली हात जाणार नाही याची काळजी मनापासून घेणाऱ्या तहसीलदार, नागरिकांच्या भावना तळमळीने विचारत घेऊन निस्वार्थीपणे काम करणाऱ्या तहसीलदार आजही जर एकदा रेबनचा गॉगल टाकला तर बॉलीवूडची ऑफर येऊ शकते इतकं रॉयल व्यक्तिमत्व असतानासुद्धा आपल्या कामात तेवढाच रुबाब आणि एटीट्यूड जपणाऱ्या डॅशिंगबाज व दर्यातील रॉयल तहसीलदार त्या आहेत.

तसं पाहायला गेलं तर सामान्य नागरिकांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आसतात. रेशन कार्ड नाही, रेशनवर धान्य मिळत नाही, घरकुलाची कामे इतर प्रकारचे सर्व छोटी-मोठी कामे त्या लगेच काही मिनिटात मार्गी लावतात.
आत्ताचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तालुक्यात कुणबी दाखला प्रोसेस जिल्ह्यात सगळ्यात फास्ट दाखला मिळण्यात सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका बहुतेक पहिला आहे. त्याच कारण ही तसच आहे कित्येक वेळा हे पाहीले ऑफीस रात्री 8- 9 वाजेपर्यत सुरु आसते. शिल्पा ठोकडे यांचे ४ खमके नायब तहसीलदार शिलेदार काझी, विजयकुमार जाधव, बाबासाहेब गायकवाड, शैलेश निकम ऐनीटाईम अव्हायलेबल आहेत. नागरिकांची गौरसोय होऊ नाही म्हणून सगळे सर्कल, तलाठी भाऊसाहेब मोठ्या शर्तीने काम करत आहेत. जहागीर शेख हेही तेवढीच जबाबदारी पार पाडत आहेत. कर्मचारी बांधवाची रात्री बारापर्यंत काम करायची तयारी आहे. सगळ्या करमाळा तालुक्याला माहीत झाले आहे की आपण १०० टक्के कामाच्या तहसिलदार आहात. तालुक्याच्या दृष्टीने कुणबी दाखला सुरू झाले आहेत, त्या निमित्ताने भरतीला ट्राय करणाऱ्या मुलांची कामे किती आत्मीयतेने व तळमळीने आपण हाताळत आहात हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. म्हणतात ना कौतुक हे नेहमी योग्य वेळेस व्हायला हवं, नाही झालं तर त्याची किंमत शून्य होते.


आमच्या तहसीलदार आहेत
एक खडतर वाट,
अशक्य ते शक्य करून दाखणाऱ्या अन्यायावर न्याय मिळऊन देणाऱ्या ज्या बदलातील समाज्याची वहिवाट
ज्यांच्यामुळे वाढला करमाळ्याचा थाट ज्या दाखवतात आतीशहण्याला कात्रजचा घाट
म्हणूनच करमाळकर एक दिवस टाकतील त्यांना जेवायला सोन्याचा पाठ ज्यांनी स्वकर्तृत्वावर करमाळाकरांसाठी कामाचा बांधला आहे घाट, म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात एक दिवस येणार आहे शिल्पा ठोकडे यांची लाट…

आज आमच्या करमाळाकरांच्या वर कधी कुठलं संकट आल तरी आम्ही आजीबात घाबरत नाहीत उलट संकटांना दार उगडून सांगतो वेलकम मित्रा स्वागत आहे तुझं पण भावा तु चुकीच्या ठिकानी आलाय इंथ सकंटाच्यां छाताडावर पाय देऊन लढणाऱ्या आणि संबंध करमाळा तालुक्यातील नागरिकांच्यासाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या तहसिलदार शिल्पा ठोकडे राहतात.

आई कमलाभवानी तहसीलदार ठोकडे यांना चांगल अरोग्य, उत्तम यश दे चांगली कामे त्यांच्या हातुन होत आहेत आजुन त्यांच्या हाताला यश दे त्यांच्या किर्तीचा ध्वज संबंध महाराष्ट्रभर फडकु दे!

काका काकडे, दादाश्री फाऊंडेशन, वीट
९५२७३२७३००

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *