करमाळा (सोलापूर) : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह थेरपी कोलकत्ता या ग्लोबल संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषद आणि दीक्षांत समारंभात सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना डॉ. गोपालेश्वर मुखर्जी (मिडिया प्रोड्युसर कोलकत्ता), उपेंद्र शर्मा (रायटर व डायरेक्टर पुरी ओडिशा) आणि डॉ. अर्पिता चटर्जी (कथक नृत्यांगना, कोलकत्ता) इत्यादी मान्यवरांच्याच हस्ते गुरु आचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय संगीत परिषद आणि दीक्षांत समारंभासाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक संगीत तज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीमध्ये महाराष्ट्रातून प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीत आणि योग या क्षेत्रामध्ये ३० वर्षापासून कार्यरत असून संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन, संगीतातील गायन, वादन आणि नृत्य कार्यशाळेचे आयोजन, युवा कलाकारांना निमंत्रित करून सन्मान करणे आणि सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात संगीत व योग माध्यमातून कार्य करणे इत्यादीच्या माध्यमातून संगीत आणि योगाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य हे सातत्याने श्री नरारे हे करत आहेत. त्यामुळेच त्यांना गुरु आचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.