करमाळा (सोलापूर) : प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेटने जुन 2023 मध्ये समर नॅशनल कॉम्पिटेशन घेतली होती. यामध्ये राज्यातून 8 हजार 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी कमलाई अबॅकस क्लासेसच्या 62 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पाच मिनिटामध्ये 100 गणित सोडवून यश संपादन केले. त्यांचा बक्षीस वितरण सोहळा यशकल्याणी सेवासदन येथे झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणीचे गणेश करे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव निळ, सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, श्री. पांडव, वंदना पांडव, अनिल बदे आदी उपस्थित होते. वेदिका सारंग पुराणिक यांनी दुसरीच्या विध्यार्थिनीने करमाळा तालुक्यातील 118 गाव न थांबता न चुकता न रिपीट करता स्मरनात ठेवढ्यासाठी अबॅकस चा वापर कसा केला हे सादर केले. सिद्धी देशमुखने इम्याजीनेशनवर 96, 53 पाढे तोंडी तयार केले. स्मरण शक्ती वाढण्यासाठी अबॅकसचा उपयोग करून घेणारी ईश्वरी सरांग पुराणिकने छत्रपतींचा थोडक्यात जीवनक्रम सांगितला.
राजकुमार सस्तारे, भक्ती वायकर, प्रणिती माकुडे, श्रितेज घणवट, रणवीर पवार, तेजस्विनी शिंदे, प्रणित राजगुरू, वेदिका पुराणिक, श्रावणी क्षीरसागर, दिक्षा दिवटे, सुयश बोकन, विराज फंड, समीक्षा घोलप, वेदांत घुगे, स्वराली हांगे, श्रेया चव्हाण, ईश्वरी परदेशी, चैतन्य कांबळे, गौरव स्वामी, तरेश थोरात, श्रेया बोकन, अंकित दोशी, रिचल दोशी, अद्विता शिंदे, विक्रमदित्य नवले, प्रणव जगताप, तेजस ढेरे, राजवीर हांगे, संस्कृती साळुंखे, अवधूत बुधवत, रुद्र दीक्षित, श्रेयश चव्हाण, ईश्वरी माकुडे, सार्थक सस्तारे, प्रेरणा पाटील, दर्पण शेख, आनंदी महाडिक, रणवीर महाडिक, विरा जाधव, सार्थक घाडगे, आरुष नलावडे, चैत्राली कांबळे, अर्शद मुलानी, निरंजन शहा, उद्धव परदेशी, अनुष्का दोशी, तनवी जोशी, शिवसमर्थ सस्तारे, मेहरन आतार, अर्णव परदेशी, रेहान सय्यद, अलिशा मुलानी, शरण्या साळुंके, युराज पंडित, देविका दीक्षित, ईश्वरी पुराणिक, प्रियश राजगुरू, मानव मुसळे, वेदांत होणकळसे, सिद्धी देशमुख, प्रशंसा होणकळसे, देवांश टाकळकर या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मंजुश्री मुसळे यांनी केले.