करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अंजनडोह व केडगाव येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी करमाळा पोलिस ठाण्यावर आरपीआय (आ) युवकचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी मोर्चा काढला.
करमाळ्यातील गायकवाड चौक ते पोलिस ठाण्यादरम्यान हा ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला. नागेश कांबळे मित्र परिवार व आरपीआय युवक आघाडीच्या वतीने या मोर्चाचे नियोजन करण्यात आले. यावेळी अंजनडोह येथील नागरिक उपस्थित होते. संशयित आरोपीना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसीलदार काझी व पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर यांनी निवेदन स्वीकारले. केडगाव येथील बांधवही यावेळी उपस्थित होते.