Public awareness about EVM and VVPAT in Karmala taluk in the background of Loksabha elections

करमाळा (सोलापूर) : लोकसभेची निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडून ‘इव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’संबंधी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. यातूनच जिंती मंडळातील गावांमध्ये ही मोहिम राबविण्यात आली. EVM अर्थात Electronic Voting Machine आणि VVPAT म्हणजेच Voter Verified Paper Audit Trail याचा प्रत्यक्ष अनुभव मतदारांना यावा यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. ही मोहिम करमाळा तालुक्यात मतदार नोंदणी अधिकारी प्रियंका आंबेकर व सहायक मतदार नोंदणी अधिकारी शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनखाली निवडणूक नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड याच्या नियंत्रणात व जिंती मंडळात मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांचे पथकामार्फत राबविण्यात येत आहे.

नागरिकांना इव्हीम व व्हीव्हीपॅट मशीनची ओळख व्हावी. इव्हीएम संबंधी गैरसमज दूर व्हावा. मतदान यंत्राची प्रत्यक्ष हाताळणी करता यावी. मतदान प्रक्रिया समजावून घेता यावी. व्हीव्हीपॅटसंबंधी पावतीमधून मतदानाची खातरजमा करून घेणे. मतदारांचा आत्मविश्वास वाढविणे ही या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील सर्व गावामध्ये ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये EVM व VVPAT संदर्भातील जनजागृती व प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी मोबाईलव्हॅनचा वापर करण्यात येत आहे. यामाध्यमातून डिजीटल स्क्रीनद्वारे लोकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.

जिंती मंडळात समाविष्ट जिंती, हिंगणी, भगतवाडी, गुलमरवाडी, देलवडी, भिलारवाडी, कावळवाडी, रामवाडी, टाकळी, खातगाव, कोंढारचिंचोली, कात्रज या गावामध्ये ही मोहिम राबविण्यात आली. सदरची मोहिम जिंती मंडळामध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी मंडळ अधिकारी संतोष गोसावी, तलाठी प्रबुद्ध माने, राहुल बडकणे, समाधान गोडसे, संजय शेटे, रामेश्वर चंदेल यांच्यासह कोतवाल कमाल मुलाणी, रहिम तांबोळी, महेबूब सय्यद, विठ्ठल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच पोलिस पाटील सोमनाथ पाटील, सुरेश माने, उमेश चव्हाण, शरद गिरंजे, सलीम मुलाणी, सोमनाथ कुचेकर, सुरेश शेजाळ आणि तुकाराम वारगड तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संबंधित गावचे सरपंच व लोकप्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *