पुणे : अमेरिकेच्या ज्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातात परिस्थिती नसतानाही शिकून त्या विद्यापीठातील एक आदर्श म्हणून नावाजले जातात. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून सन्मान करते. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी लिहिलेल्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विचारवंत डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

लेखक जगदीश ओहोळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ‘आंबेडकराईट स्टुडंट्स ऑफ कोलंबिया’ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक, विचारवंत डॉ. सुरज एंगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नालिझम विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’ प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक विकास तातड, अभ्यासक चारुदत्त म्हसदे, नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास म्हसदे, मिलिंद अवसरमोल, नितीन सूर्यतळे (आंबेडकर इंटरनॅशनल मिशन), फिलिप मार्टिन (Phillip Martin, senior investigative reporter ) यांसह कोलंबिया विद्यापीठातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थित होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन तेथे करण्यात आले.

अमेरिकेतील ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’चे प्रमुख विकास तातड म्हणाले, कोलंबिया विद्यापीठात डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले. आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत. कोलंबियात ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’च्या माध्यमातून भीमजयंती सह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो. या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते व लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक व सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे.

लेखक जगदीश ओहोळ म्हणाले, पुस्तकावर लोक जे प्रेम करत आहेत, ते पुस्तकातील आशय आणि त्यातून त्यांना पटलेले जागतिक प्रेरणादायी बाबासाहेब, यामुळे लोक इतका भरभरून प्रतिसाद देत आहेत. नव्या पिढीला, नव्या भाषेत मोटिव्हेशनल आणि सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. लवकरच या पुस्तकाच्या इंग्रजी व हिंदी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करणार आहोत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *