राज ठाकरे यांचा आदेश अंतिम ठेऊन काम केले जाणार : संजय घोलप

Raj Thackeray order will be kept final and work will be done Sanjay Gholap

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम ठेऊन काम करणार आहे, असे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी स्पष्ट केले आहे.

घोलप म्हणाले, विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली ताकद दाखवून देईल. पक्ष स्थापनेपासून मनसे पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांची समाजसेवक म्हणुन कामे केली आहेत. मताचा विचार करून कधीही काम केले नाही. मतदारसंघातील चांगले कामे केली त्यांचे कौतुक केले व ज्यांनी चुकीचे काम केले त्याच्यावर निर्भयपणे उघडपणे विरोध केला. ठाकरे यांच्या विचारावर आम्ही काम करत आहोत. मनसेचे दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने हे काम केले आहे. करमाळा तालुक्यातील व शहरातील प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नावर व विविध सामाजिक घटकांवर कायमच मनसेची साथ राहिली आहे. त्यामुळे आमची ताकद मतरूपी आगामी निवडणुकीत दिसुन येईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *