राजेंद्रसिंह राजेभोसले यांचा वीटमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Rajendrasinh Rajebhosale entry into Sharad Pawar NCP in Vit

करमाळा (सोलापूर) : जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.

राजेभोसले म्हणाले, ‘पाच वर्षात विकासापासून वंचित असलेल्या वीटसह परिसराचे नुकसान भरून काढण्यासाठी पाटील यांना आमदार करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आपण नारायण पाटील यांच्याबरोबर राहून विकास करणार आहे.’ यावेळी अभयसिंह राजेभोसले, दिगंबर गाडे, तात्यासाहेब जाधव, अंकुश जाधव, विशाल गणगे, दिगंबर राऊत, धोंडीबा जाधव, गौतम जाधव, सतीश निंबाळकर, विशाल कांबळे, श्रीकांत जाधव, विजयकुमार गाडे, आबा सुर्वे, कांतीलाल काळे, बाळू माळी, पांडुरंग जाधव, शांतीलाल जाधव, समाधान राऊत, प्रल्हाद जाधव, प्रल्हाद जाधव, गोवर्धन जाधव, अनिल ढेरे, हनुमंत ढेरे आदींनी प्रवेश केला.

देवानंद बागल, तालुकाध्यक्ष संतोष वारे, बिभीषण आवटे, किशोर चोपडे, सुभाष जाधव, अशोकराव राऊत, नवनाथ जाधव, बिभीषण ढेरे, संतोष ढेरे, ज्योतीराम राऊत, सुभाष ढेरे, हनुमंत ढेरे, डॉ. भागवत ढेरे, हबीब शेख, हनुमंत नाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *