Rashmi Bagal the leader of the Bagal group reacted to the results of MakaiRashmi Bagal the leader of the Bagal group reacted to the results of Makai

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचा दणदणीत विजयी झाला आहे. या विजयामुळे बागल गटाची सत्ता कायम राहिली आहे. त्यावर नेत्या रश्मी बागल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बागल म्हणाल्या आहेत की, लोकनेते दिगंबरराव बागल मकाई पॅनलच्या उमेदवारांना या निवडणुकीत झालेल्या एकूण ९८०० मतांपैकी ८४०० एवढी प्रचंड मते मिळाली आहेत. एवढी प्रचंड मते देऊन सभासदांनी विजयी केले आहे. या प्रचंड मताधिक्यासाठी सर्व सभासदांचे आभार. हा आमच्यासाठी फक्त विजयी नसून एक जबाबदारी आहे. जी पार पाडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू. साखर उद्योग आणि त्यातही सहकारी साखर कारखाने चालवणे कसोटीचे ठरत असतानाही नूतन संचालक मंडळ निश्चितपणे मकाई साखर कारखाना स्व. मामांच्या विचारांना अनुसरून नेटकेपणाने चालवेल असा विश्वास आहे. हा विजयी बागल गटावरील सर्वसामान्य सभासदांचा विश्वास आणि बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *