Recruitment of Group C posts in District Soldier Welfare Office exserviceman wives and ex-serviceman candidates are invited to apply

सोलापूर : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी फक्त माजी सैनिकांच्या पत्नी तसेच माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

सरळ सेवेची पदे, कल्याण संघटक -40, वस्तीगृह अधीक्षक-17, कवायत प्रशिक्षक-1, शारीरिक प्रशिक्षण निर्देशक-1, तसेच सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी यांच्याकरीता अधीक्षिका गट क-1 ही पदे भरली जाणार आहे. अधीक्षिका पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध न झाल्यास सेवाप्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येईल. वरील पदापैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्य व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

सदर भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 12 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर लिंक बंद करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *