‘वडगावला जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक झाड काढा’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर एक धोकादायक झाड आहे. संबंधित विभागाने हे झाड त्वरित काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मांगी येथून वडगाव उत्तर या गावाकडे जाताना सुदाम काळे यांच्या वस्ती लगत रस्त्याच्या कडेला एक वाटलेले झाड आहे. या रस्त्याने मांगी येथे माध्यमिक शाळेकरिता अनेक लहान मुले व मुली ये- जा करतात. याशिवाय अनेक नागरिकही येथून ये- जा करतात. त्यामुळे वटलेले हे झाड त्वरित काढावे, अशी मागणी केली आहे. येथून अनेक नागरिक व विद्यार्थी ये- जा करतात. त्यात हे वाटलेले झाड कोसळून धोका होऊ शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *