Repair the brick road from Jare otherwise protest

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील झरे ते वीट या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

प्रहार शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले, तालुक्यातील झरे ते वीट या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व झरे ग्रामपंचायतने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रस्त्यावर येऊन स्वतः पाहणी करून आठ दिवसाच्या आत रस्ता दुरुस्ती केला नाही तर प्रहार संघटना उग्र आंदोलन करणार, असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *