करमाळा : किल्ला वेस येथील बाळासाहेब भानुदास शेलार (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते सेवानिवृत्त पोलिस होते. करमाळा, मोहोळ, नातेपुते, कुर्डूवाडी, बार्शी व सोलापूर येथे पोलिस दलात सेवा केली. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर करमाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. गुरुवारी ७ डिसेंबरला सिद्धीटेक येथे दशक्रीया विधी होणार आहे.
सेवानिवृत्त पोलिस बाळासाहेब शेलार यांचे निधन
