करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे ‘महसुल सप्ताह’निमित्त महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली. याबरोबर गावातील लाभार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले. येथील अनेक शेतकऱ्यांच्या ‘सात बार’वरील बँकेचा बोजा कमी झालेले उतारे देऊन योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी तलाठी विवेक कसबे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. संजय गांधी निराधार योजनांची माहिती, माजी सैनिक यांचा सन्मान, ऑनलाईन सातबारा आदींची माहिती दिली. यावेळी सरपंच रमेश खरात, पोलिस पाटील प्रदीप पाटील, नवनाथ देवमुंडे, रामदास देवमुंडे, संतोष नलवडे, पोपट पवार, ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजू शेख, उद्धव कांबळे, भास्कर कराळे, विठ्ठल नलवडे, ज्ञानदेव रंणदवे, अतुल रंणदवे, सोमनाथ भालेराव, प्रकाश खराडे, पोपट भालेराव आदी उपस्थित होते. गणेश माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रांताधिकारी समाधान घुटुकडे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, महसुलाचे तहसीलदार शैलेश निकम, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड व मंडळ अधिकारी अनिल ठाकर यांच्या आदींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.