करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांची गुरुवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे. महाविकास आघाडीने मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. मोहिते पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने भाजप सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पवार यांचीही सभा झाली होती. त्यानंतर कंदर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा झाली होती. धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यात जोरदार प्रचार सुरु केला आहे. आता अमोल कोल्हे यांची वीटमध्ये सभा होत आहे.


