करमाळा (सोलापूर) : आमदार नारायण पाटील यांनी जेऊर येथे विकासकामे आढावा बैठक घेतली. आमदार पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेऊन १०० दिवस झाले. याबद्दल व पाच वर्षांत करावयाच्या विकास कामाबाबत यावेळी चर्चा झाली.
ते म्हणाले की दहिगाव उपसा सिंचन योजना पुर्ण क्षमतेने चालवून लाभक्षेत्रात पाणी पोहचवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूरी व कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. आदिनाथ कारखाना हा परत एकदा सुरु होऊन पुर्ण क्षमतेने यातुन गाळप झाले पाहिजे या करीता आता आगामी निवडणुकीत सभासद आपली भुमिका चांगल्या रितीने पार पाडतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते सभासद हिताचा निर्णय आपण घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. अर्जुनराव सरक यांनी संभाव्य निवडुकीच्या निवडणुक प्रक्रियेची माहिती दिली.
शहाजीराव देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, प्राचार्य जयप्रकाश बिले, नवनाथ झोळ, डाॅ. हरिदास केवारे, माजी सभापती अतुल पाटील, माजी सदस्य ऍड. राहुल सावंत, बिभीषण आवटे, सुखलाल लुणावत, रविबुआ कोकरे, देवानंद बागल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, राजाभाऊ कदम, डॉ. अमोल घाडगे, संजय गुटाळ, बापुराव रणसिंग, किरण कवडे, बाळासाहेब पवार, विठ्ठल शिंदे, संतोष खाटमोडे पाटील, बप्पा पाटील, संजय जाधव, गहिनीनाथ ननवरे, विकास गलांडे, पंडीत वळेकर, अमरजित साळुंखे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील तळेकर यांनी तर आभार देवानंद बागल यांनी मानले.