करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने गुरुप्रसाद मंगल येथे विविध कार्यक्रमाने महिला दिन साजरा झाला. या प्रसंगी महिलांसाठी ‘सखी मेळा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये ग्राहक गीत, योग गीत प्रात्यक्षिक, गीता प्रार्थना, एकपात्री नाटक, मूकाभिनय, डंब डान्स, लावणी, देशभक्तीपर गीत, राष्ट्रीय एकत्मता मुक अभिनय, नऊवारी साडी व फेटे बांधून लेझिम, रेट्रो डान्स, रिमिक्स डान्स, दादा कोंडके रीमिक्स डान्स, सोलो डान्स, ग्रुप डान्स, तलवार डान्स, गायन, काठी work out, mother doughter dance अशा कला महिलांनी सादर केल्या.
प्रत्येक सादरीकरण हे एकापेक्षा एक बहारदार होते. महीला प्रेक्षकांनी शिट्या व प्रचंड टाळ्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम पाहायला सर्व स्तरातील महिलांनी गर्दी केली होती. कार्यक्रमासाठी करमाळा नगरपालिकेचे सहकार्य होते. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष ऍड. शशीकांत नरुटे, भीष्माचार्य चांदणे, चक्रधर पाटील, निलेश कुलकर्णी, श्री. शिंदे, श्री. कोळेकर, अशपाक सय्यद, विजय देशपांडे तसेच महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माधुरी परदेशी, निलिमा पुंडे, मंजिरी जोशी, ललिता वांगडे, रेखा परदेशी, सारीका पुराणिक, निशिगंधा शेंडे व सुलभा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती माने यांनी केले.