करमाळा (सोलापूर) : भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब होसिंग यांची तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जिल्हा सरचिटणीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आले. भाजप जिल्हा सरचिटणीस चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आपण व्यापार आघाडीच्या मार्फत काम करणार आहे, असे होसिंग यांनी सांगिले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सुरवसे, भैय्या कुंभार, संजय किरवे, महादेव गोसावी, गणेश गोसावी उपस्थित होते.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/02/Kemkar-I-Cair-1-1024x738.jpg)
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/02/Dhale-3-1-1024x613.jpg)