खडकेवाडीतून 5 शेळ्या व तीन बोकडं घेऊन सालगडी फरार

Salgadi absconded with 5 goats and three bucks from Khadkewadi

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकेवाडी येथून सालगडयाने पाच शेळ्या व तीन बोकड चोरून नेली आहेत. याबाबत नंदाबाई रावसाहेब शिरसाट (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तुषार प्रकाश नामदास (रा. जाधववाडी, जि. सातारा) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेळ्यांची किंमत ३० हजार आहे.

गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी हा खडकेवाडी येथे फिर्यादी शिरसाट यांच्या शेतात सालगडी म्हणून सहा महिन्यापासून काम करत होता. ४ तारखेला सांयकाळी ५ ते ६ तारखेला सकाळी ६ जाण्याच्या सुमारास तो शेळ्या व बोकड घेऊन फरार झाला. शिरसाट यांचा मुलगा पुण्यात रहातो. त्यांच्याकडे १३ एकर जमीन आहे. ती जमीन व शेळ्या संभाळाण्यासाठी सालगडी ठेवला होता. नामदास हा शेतात राहत होता. ६ तारखेला तो शेतात दिसला नाही. तेथेच असलेल्या शेळ्याही नव्हत्या. त्याचा शोध घेऊनही तो दिसला नाही. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *