करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त नामदेवराव जगताप यांना यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी स्व. नामदेवराव जगताप यांच्या कार्याची माहिती दिली. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी उजनी धरण, मांगी धरण, कुकडी प्रकल्प उभारले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी विभागाच्या डॉ. वंदना भाग्यवंत यांनी केले. आभार प्रा. हनुमंत भोंग यांनी मानले.
