करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संगोबा येथे सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. तर आवाटी येथे साडेअकरा वाजता नवीन वीज उपकेंद्राचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय इतरही कामांचे भूमीपूजन होणार आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम होणार आहेत.
आमदार शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी साधारण अडीच हजार कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे. त्या कामांची उदघाटने आता केली जात आहेत. करमाळा- बोरगाव- घारगाव ते जिल्हा या रस्त्यासाठी 4 कोटी 50 लाख, बोरगाव ते निलज रस्ता या रस्त्यासाठी 2 कोटी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सटवाई वस्ती- निलज ते बिटरगाव श्री या रस्त्यासाठी 3 कोटी 28 लाख, पर्यटन विभागकडून संगोबा घाट बांधणे 90 लाख असा निधी मंजूर आहे.
आवाटी येथे वीज उपकेंद्राचे लोकार्पण होणार आहे. यासाठी 4 कोटी निधी मंजूर झाला होता. आवाटी दर्गा वॉल कंपाऊंडला 99 लाख मंजूर झाले आहेत. त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे. याशिवाय गौंडरे फाटा ते नेरले रस्त्यासाठी 2 कोटी 85 लाख, फिसरे- हिसरे- हिवरे ते कोळगाव रस्त्यासाठी 2 कोटी मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे.