करमाळा : संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन (शिंपी/ दर्जी समजाचे) रविवारी (२२ फेब्रुवारी) नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. देशातील शिंपी समाजातील व सर्व पोटजाती यानिमित्त एकत्र येत आहेत. या संमेलनाला पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला (राजस्थान), पद्मश्री कन्नुभाई टेलर (गुजरात), प्रवीणभाई दर्जी (गुजरात) व संत मंडळी, राजकीय प्रतिभावान समाजबंधू, भजनी मंडळे यांचा सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमाला देशपातळीवरील मान्यवर उपस्थित राहणार असून संत नामदेव विश्व पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषि मंत्री प्रल्हाद जोशी, उपभोक्ता मामले, खासदार प्रणीति शिंदे, संजयजी नहार, अनिल बोंडे, संजय खोडके, सुलभा खोडके, आमदार रविकुमार राणा, नवनीत राणा, अभिनेता गोविंदा यांच्यासह संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे वंशज संत मंडळी, हभप जिंतेंद्रनाथ महाराज, स्वामी गोविन्दगिरी महाराज, सप्तखंजरी वादक श्री सत्यपाल महाराज, समाजाचे विविध पदाधिकारी, समाजातील सर्व राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी महिती संतोष मुळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत चुंबळकर, जिल्हा संघटक रविशेठ वनारसे, अशोक गाठे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पांडुरंग वडे यांनी दिली आहे.
