Sarde felicitated at Bagal office for being elected as Upasar Panchayat of Chikhalthan Grampanchayat

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात चिखलठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश सरडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज (शनिवारी) संपर्क कार्यालयात सत्कार झाला.

यावेळी मकाईचे संचालक महादेवराव सरडे, अ‍ॅड. जयदीप देवकर, चिखलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मच्छिंद्र सरडे, कुगावचे उपसरपंच दादासाहेब डोंगरे, नागनाथ सरडे, चिखलठाण ग्रामपंचायत सदस्य अक्षय सरडे, समाधान गव्हाणे, बब्रुवान मोरे पाटील, अर्जुनराव अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गावाच्या हितासाठी व प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *